Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे ३ सप्टेंबर २०२३ रोजी घेतलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि नौदल अकादमी परीक्षा (II) २०२३ चे अंतिम निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे ३ सप्टेंबर २०२३ रोजी घेतलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि नौदल अकादमी परीक्षा (II) २०२३ चे अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, दि. ३: राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये १५२ व्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि नौदल अकादमीच्या ११४ व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (आयएनएसी) केंद्रीय लोकसेवा आयोगाने ३ सप्टेंबर २०२३ रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने  त्यानंतर घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या ६९९ उमेदवारांची गुणवत्तेच्या क्रमाने यादी खालीलप्रमाणे आहे.

  1. वरील अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेसंबंधी तपशीलवार माहितीसाठी, कृपया संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.inwww.joinindiannavy.gov.in आणि www.careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
  2. या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत.
  3. उपरोक्त सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून ती त्यांनी अतिरिक्त महासंचालनालय, ऍडज्युटंट जनरल शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (लष्कर),  पश्चिम ब्लॉक क्रमांक III, विंग-I, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066 येथे थेट सादर केलेल्या जन्मदाखला, शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या आधारे असेल तसेच ती आधीच केली गेलेली नसेल आणि यूपीएससीकडे नसेल.
  4. पत्त्यात कोणताही बदल झाल्यास, उमेदवारांनी वरील पत्त्यावर थेट लष्कराच्या मुख्यालयाला त्वरित कळवावे.
  5. निकाल यूपीएससी च्या https://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांनी वेबसाइटवर उपलब्ध होतील.
  6. कोणत्याही अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या गेट ‘सी’ जवळील सुविधा काउंटरवर वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/011-23381125/011-23098543 वर कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 17:00 दरम्यान संपर्क साधावा. याशिवाय, एसएसबी/मुलाखतीशी संबंधित बाबींसाठी, उमेदवार दूरध्वनी क्रमांक 011-26175473 किंवा joinindianarmy.nic.in यावर लष्करासाठी प्रथम पसंती म्हणून संपर्क साधू शकतात, तसेच 011-23010097 किंवा ईमेल: Officer-navy[at]nic[dot]in. किंवा joinindiannavy.gov.in नौसेना/नौदल अकादमीसाठी पहिली पसंती म्हणून आणि हवाई दलासाठी 011-23010231 Extn.7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in. यावर पहिली पसंती म्हणून संपर्क साधू शकतात.

लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *