पुढचा अध्यक्ष कोण हे ठरवण्यासाठी १५ पक्ष सदस्यांची समिती गठित
मुंबई, दि. २: मागील ५० वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच राजकीय पटलावर एकंच कल्लोळ उडाला आहे. पवार हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मानले जातात.
पवारांच्या या निर्णयाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरक्षित एक्झिट म्हणून पाहिले जात आहे. ८२ वर्षीय पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी १५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कमान अजित पवार यांच्या हातात पडणार आहे असे सध्याचे चित्र आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपणही आपल्या पदाचा राजीनामा देऊ असा पवित्रा घेतला आहे. राजीनाम्याच्या घोषणेनंतर पवार यांच्या वरळी येथील सिल्वर ओक या निवासस्थानाजवळ कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी गोळा होण्यास सुरुवात झाली आहे.
