नवाब मलिक यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
मनी लाँडरींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज आज फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या आदेशात कसलाही हस्तक्षेप करणार नसल्याचं न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमुर्ती सुर्यकांत यांच्या पीठानं स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणी सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात मलिक कायद्यानुसार दाद मागू शकतात, असा दिलासाही पीठानं मलिक यांना दिला. काल मलिक यांच्या विरोधात ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ५ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमसोबत कथित आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. २३ फेब्रुवारीपासून नवाब मलिक अटकेत आहेत.
Source-AIR
