वाचा अटक करण्यात आलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी करण्यात आली
मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयानं अटक केल्याचं वृत्त आहे. आज सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमाराला त्यांना अटक करुन आरोग्य तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं. कुख्यात गुंड आणि दाऊद कासकरशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्या घरून ई़डीच्या कार्यालयात नेलं आणि चौकशी केली, असं मलिक यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं. ईडी कडून छोटा शकील, इब्राहीम कासकर, इकबाल मिर्ची आणि इतरांची हवाला प्रकरणी चौकशी सुरू होती. राष्ट्रीय तपास संस्थेनं ईब्राहीम कासकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता, त्या आधारे ईडी चौकशी करत असल्याचं सांगण्यात येतंय.
