खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने ठरवले अवैध; आनंदराव अडसूळ यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा
मुंबई, दि.८: अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवेल आहे. या संदर्भात माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.
अमरावती लोकसभा मतदारसंघ है अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाला त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे आढळले. आज झालेल्या सुनावणीत त्यांना २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे खासदार राणा यांची खासदारकी धोक्यात आली असून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या गळ्यात खासदारकी ची माळ पडू शकते.
