Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महापालिकेकडून घणसोली विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

नवी मुंबई महापालिकेकडून घणसोली विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील समर्थ नगर, डी-मार्ट लगत, घणसोली, याठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम, जिजामाता नगर, घणसोली या ठिकाणी तळमजल्याचे बांधकाम आणि कौलआळी, घणसोली या ठिकाणी आरसीसी जोत्याचे अनधिकृत बांधकाम सुरु होते. या तिनही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता सदर बांधकाम अनधिकृतपणे सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार तीनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-१०, जेसीबी-१, ब्रेकर-२, गॅस कटर-१ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *