लढा कोरोनाशी : नवी मुंबई पोलिसांनी बनवली राज्यातील पहिली सॅनिटाइज शॉवर व्हॅन
नवी मुंबई: कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सध्या नवी मुंबई पोलीस बऱ्याच उपाययोजना करत आहे. त्याच जोडीला नवनवे उपक्रम देखील राबवत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्याचवेळी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यकडे व सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काेवीड १९ काेराेना या महामारीमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदाेबस्तावरील पोलिसांना सकाळी व संध्याकाळी सेॅनिटाइज करण्यासाठी सेॅनिटाइज शॉवर व्हॅन तयार करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांचा हा प्रयोग राज्यभर राबवला तर नक्कीच पोलिसांचे कोरोना विषाणूपासून रक्षण होईल.
काेवीड 19 काेराेना या महामारीमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदाेबस्तावरील पोलिसांना सकाळी व संध्याकाळी सेॅनिटाइज करण्यासाठी सेॅनिटाइज शॉवर व्हॅन तयार करण्यात आली आहे. #WarAgainstCoronavirus pic.twitter.com/M6fDh2KCS3
— नवी मुंबई पोलीस – Navi Mumbai Police (@Navimumpolice) April 9, 2020
