नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलायला माथाडी कामगारांचा नकार
नवी मुंबई, दि.१६: नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलायला माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे आज १५ ते २० कांद्याच्या गाड्या मार्केट आवाराबाहेरच उभ्या आहेत, तर ५० किलो पेक्षा कमी वजन असलेल्या ८० टक्के गोण्या उतरवण्यात आल्या आहेत. या संदर्भात गेल्या दीड वर्षांपासून माथाडी कामगार व्यापारी संघटनांशी चर्चा करत आहेत. बाजार समितीनही याबाबत परित्रक काढलं होतं. मात्र याबाबत ठोस अंमलबजावणी झाली नसल्याने आज माथाडी कामगारांनी ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलायला नकार दिला. या मागणीची अंमलबजावणी झाली नाही, तर उद्यापासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
