नवी मुंबई येथील अर्पण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे समाजातील वंचितांना रंगपंचमी साहित्य व अल्पोहाराचे वाटप
नवी मुंबई, दि.१८: काल दि.१७/३/२०२२ रोजी होळीच्या पार्श्वभूमीवर सानपाडा, नवी मुंबई येथे अर्पण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरीब व गरजू मुलांना रंगपंचमी साहित्य व अल्पोहार वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळी व धुळवडीच्या सणाचा आनंद इतर मुलांप्रमाणे समाजातील निम्न स्तरावरील मुलांना विशेषतः झोपडपट्टी व फुटपाथच्या कडेला राहणार्या बेघरांना घेता यावा हा मूळ हेतू नजरेसमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणि नेमेके हेच यातून सध्या झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले. अनपेक्षितपणे निरनिराळे रंग, विविध आकाराच्या पाण्याच्या पिचकार्या व सोबतीला खाऊ हातात आल्यावर या वंचितांच्या चेहर्यावर आलेली आनंदाची लकेर सारं काही सांगून जात होती.

अर्पण चॅरिटेबल ट्रस्ट च्या उपक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांकडून मदतनिधी देण्यात आला. मागील काही काळापासून संस्थेतर्फे अशा प्रकारच्या अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भविष्यातही समाजातील गरजवंतांना थेट मदत पोहोचवण्यासाठी आम्ही काही अनोखे उपक्रम घेऊन येणार आहोत असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाला सतीश पाटील-अध्यक्ष शेकाप उलवे नोड, राजकुमार यादव-उपाध्यक्ष, नन्हेलाल निषम-उपसचिव, नीरज वर्मा-उपखजिनदार, नयन बारे व रोडे आदींची उपस्थिती लाभली.

