बहुप्रतीक्षित सी.बी.डी. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा उद्यापासून होणार सुरु
पनवेल, दि. १६: नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचा उद्या अखेर शुभारंभ होत आहे. नवी मुंबईकरांना उद्यापासून मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेता येईल. बेलापूर ते पेंधर मार्गावरची मेट्रोच्या लोकार्पणाची वाट न पाहता प्रवाशांच्या उपयोगासाठी ही सेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत. या मार्गावर उद्या दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान मेट्रोच्या फेऱ्या होतील. शनिवारपासून दररोज सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दर १५ मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या होतील. एकूण ११ थांबे असलेल्या या मेट्रो मार्गावर १० ते ४० रुपयांच्या दरम्यान तिकिट असेल.
Source – AIR
