व्यापारी मागण्यांवर ठाम
नाशिक, दि. 1: नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने पुकारलेला लिलाव बंद आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. कांदा प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थी नंतरही लिलाव बंद ठेवण्याचा निर्धार नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं व्यक्त केला आहे. पिंपळगाव बसवंत येथे काल झालेल्या नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीत लिलाव बंद आंदोलन पुढं चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनं वाढवलेलं ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावं, नाबार्ड आणि एनसीसीएफ ने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शासकीय स्तरावर बैठकाही झाल्या आहेत.
Source – AIR
