Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश

नवी दिल्ली, दि. ८: कृषी उडान योजना २.० ची घोषणा २७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती. प्रामुख्याने डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत अन्न उत्पादनांची वाहतूक करण्यावर या योजनेचा मुख्य भर आहे. या योजनेत प्रामुख्याने ईशान्येकडील, डोंगराळ आणि आदिवासी प्रदेशांवर लक्ष केंदित करणारे २५ विमानतळ असून इतर प्रदेश/क्षेत्रातील २८ विमानतळांचा समावेश आहे. कृषी उडान २.० योजनेच्या मूल्यमापनानंतर, एकूण ५८ विमानतळांमध्ये आणखी पाच विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.

कृषी उडान योजना २.० योजनेचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध साधनांमध्ये हवाई वाहतूकीचा वाटा वाढवणे आहे, ज्यामध्ये फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुधन आणि प्रक्रिया उत्पादने समाविष्ट आहेत. ही योजना शेतकर्‍यांना कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यास मदत करते .

सुरुवातीला ६ महिन्यांसाठी ५३ विमानतळांचा प्रायोगिक प्रकल्पात  समावेश करण्यात आला होता. त्यानंतर, पुनरावलोकनादरम्यान, त्यात आणखी ५ विमानतळ जोडले गेले आहेत अशा प्रकारे एकूण ५८ विमानतळांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे – आदमपूर, आगरतळा, अगाट्टी, आग्रा, अमृतसर, बागडोगरा, बरेली, भुज, भुंतर, चंदीगड, कोईम्बतूर, देहरादून, दिब्रुगड, दिमापूर, गग्गल, गोवा, गोरखपूर, हिंडन, इंफाळ, इंदूर, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, जोरहाट, कानपूर, कोलकाता, लेह, लेंगपुई, लीलाबारी, नाशिक, पक्योंग, पंतनगर, पठाणकोट, पटना, पिथौरागढ, पोर्ट-ब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपूर, राजकोट, रांची, रुपसी, शिलाँग, शिमला, सिलचर, श्रीनगर, तेजपूर, तेजू, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, वाराणसी, विशाखापट्टणम, बेळगाव, भोपाळ, दरभंगा, जबलपूर आणि झारसुगुडा. नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *