“काँग्रेसने स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य” – माजी मंत्री नसीम खान
मुंबई, दि.१४: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य असून, पक्षाचीही भूमिका हीच असल्यानं आपलं त्याला समर्थन असल्याचं, माजी मंत्री- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे. ते रविवारी मुंबईत बोलत होते.
काँग्रेस सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसनं एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून, स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल, असं खान म्हणाले.
शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी माजी मंत्री नसीम खान यांचा चांदीवली विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणूकित पराभव केला होता.
