मानाचा नारी-शक्ती पुरस्कार महाराष्ट्रातील ‘ह्या’ ६ स्त्रियांना प्रदान
काल महिला दिनाचे औचित्य साधून भारत सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील ६ यशस्विनींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सीड मदर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे, भारतातील पहिल्या कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव, यशस्वी उद्योगिनी कल्पना सरोज, हातमागाच्या क्षेत्रात कार्यरत स्मृति मोरारका, महिलांसाठीच्या बँकिंग क्षेत्रात विशेष योगदान देत असलेल्या बँकर चेतना सिन्हा आणि कथ्थक प्रशिक्षि का सीमा मेहता यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
देशभरातून जवळपास ४४ यशस्वी महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या.
