२००२ च्या गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना क्लीन-चिट
अहमदाबाद: २००२ साली झालेल्या गोध्रा कांड आणि नंतर उसळलेल्या गुजरात दंगलीचा तपास करण्यासाठी गठीत केलेल्या न्यायमूर्ती नानावटी-मेहता आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना क्लीन-चिट दिली आहे. गोध्रा कांड हे षडयंत्र होते पण यानंतर उसळलेल्या दंगली षडयंत्र नव्हत्या असे निरीक्षणही यावेळी मांडण्यात आले. गुजरात विधानसभेत आज हा अहवाल जाहीर करण्यात आला. गुजरातचे गृहराज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी पत्रकारांना माहिती दिली की, “नानावटी-मेहता” आयोगाने ३ हजारांपेक्षा जास्त पानांचा अंतिम अहवाल सादर केला. जवळपास ४४ हजार ४४५ शपथपत्र व ४८८ सरकारी अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या शपथ पत्रांच्या आधारे हा अहवाल बनवण्यात आला आहे। ” जडेजा म्हणाले की गोध्रा कांडात ५८ कारसेवकांना जिवंत जाळले गेले होते तसेच ४० जणं जखमी झाले होते.
