वाचा राणे वादग्रस्त प्रकरणी थोडक्यात नेमकं काय घडलं
रत्नागिरी, दि.२४: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा सुरू केल्यापासून एका मागून एक येणार्या त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय धुरळा उडवून दिला आहे. असंच एक वक्तव्य त्यांनी काल महाड येथील सभेत केल्यानंतर त्याचे तात्काळ पडसाद उमटले. नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याबाबत वक्तव्य केलं. ज्यानंतर शिवसेनेकडून तात्काळ प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आली. याच जोडीला शिवसैनिकांकडून राणे यांच्या विरोधात राज्यातील अनेक पोलिस स्थानकांत गुन्हे दाखल करण्यता आले.
नारायण राणे यांच्या वक्तव्यांची तात्काळ दखल घेत जनआशीर्वाद यात्रे निमित्त संगमेश्वर, रत्नागिरी येथे आलेल्या राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना लागलीच अटक करण्यता आली. यावेळी त्यांचे माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या समर्थकांनी पोलिसांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला परंतू मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अखेर त्यांना अटक केलीच. तत्पूर्वी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालत अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला शिवाय मुंबई उच्च न्यायालयानेही लगेचच सुनावणी घेण्यास नकार दिला ज्यामुळे राणेंना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला.
वाचा नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. ‘आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती’ असं नारायण यांनी म्हटलं.
सध्या राज्यता इतरही महत्वाचे विषय असून त्याकडे सत्ताधारी व विरोधक दोघेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना असाच प्रश्न पडतोय.
