नव्या वर्षापासून नांदेड-अमृतसर-नांदेड रेल्वे एक्सप्रेसच्या मार्गांमध्ये बदल
नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या मार्गिकेत नव्या वर्षापासून म्हणजेच २०२१ पासून बदल होणार आहे. येत्या १ जानेवारीपासून ही विशेष गाडी अंबाला, चंदिगढ आणि सानवाल मार्गे धावेल. पूर्वी ही गाडी अंबाला, सरहिंद, सानवाल या मार्गाने धावत होती.
या गाडीचा राजपुरा, आणि खन्ना इथला थांबा रद्द करण्यात आला आहे. या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, आता ही गाडी अमृतसरहून पहाटे चार वाजून २५ मिनिटांनी सुटेल, औरंगाबाद येथे दररोज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.
दरम्यान, आज ही गाडी दिल्ली ते अमृतसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. उद्या ही गाडी दिल्लीहूनच नांदेडला परतणार आहे.
Source -AIR
