नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
२०२० चे साहित्य अकादमी पुरस्कार शुक्रवार जाहीर झाले असून नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. साहित्य अकादमीने आज २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक संस्मरण आणि एका महाकाव्याचा समावेश आहे.