nana patekar
नाना लवकरच करणार तेलुगु सिनेइंडस्ट्रीत पदार्पण
मराठी चित्रपटसुष्टीतील नावाजलेले अभिनेते नाना पाटेकर लवकरच तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहेत. नाना पाटेकर तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या ‘नन्ना नेनू’ या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची कळते.
दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाना पाटेकर योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. यानंतर नाना पाटेकर यांच्याशी चर्चा सुरू करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी तनुश्री दत्तने मीटू चळवळीच्या माध्यमातून नाना पाटेकरांवर अनेक आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी त्याची झळ नानांच्या कारकिर्दीला नक्कीच बसली. मीटूच्या ‘हाउसफुल ४’ मधून नानांना डच्चू देण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर नाना पाटेकर आता थेट तेलुगु चित्रपटात झळकणार आहेत.
