देशातल्या पहिल्या रॅपिडेक्स रेल्वे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा
उत्तर प्रदेश, दि. २०: राज्यांचा विकास झाला तरचं सर्वार्थाने देशाचा विकास होऊ शकतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या पहिल्या रॅपिडेक्स (RAPIDX) नमो भारत रेल्वे गाडीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील साहिबाबाद स्थानकात हिरवा झेंडा दाखविला.
चार वर्षांपूर्वी या गाडीच्या निर्मितीचं काम सुरु झालं होतं. बेंगळुरू मेट्रोच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरच्या दोन मार्गांचं लोकार्पणदेखील प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने यावेळी केलं. RRTS या अद्ययावत यंत्रणेचा उपयोग केल्याने या गाडीचा वेग ताशी १६० किलोमीटर असेल. या गाडीची क्षमता सतराशे प्रवासी वाहून नेण्याची आहे. गाडीत सहा डबे असून त्यातला एक महिला प्रवाशांसाठी राखीव आहे. उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरू होणार आहे.
Source – AIR
