सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर नागपूर मनपाची धडक कारवाई
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १८ प्रकरणांची नोंद करून ७२०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून १२०० रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृह, लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून १८५०० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे/साठवणे, या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ४३ प्रकरणांची नोंद करून रु ८६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०९ प्रकरणांची नोंद करून रु ९००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां ०८ प्रकरणाची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०८ प्रकरणांची नोंद करून ५० हजार रुपयाचा दंड वसूल केला. यात प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां २ प्रकरणातून १० हजार रुपये वसूल करण्यात आले. शोध पथकाने रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकण्यावर रुपये १० हजाराचा दंड प्रत्येकी अंजेल डेव्हलपर्स आणि हॅपी होम बिल्डर कडुन वसुल केला.
