Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोरभवन(विस्तारित) नवीन शहर बस डेपोकरिता प्रस्तावित पहिल्या १२ मिटर रस्त्याचे काम मनपा हॉट मिक्स प्लान्ट तर्फे पूर्ण

मोरभवन(विस्तारित) नवीन शहर बस डेपोकरिता प्रस्तावित पहिल्या १२ मिटर रस्त्याचे काम मनपा हॉट मिक्स प्लान्ट तर्फे पूर्ण

नागपूर, दि. ६: नागपूर सीताबर्डी येथील मध्यवर्ती मोरभवन(विस्तारित) बस डेपो येथे गत तीन सप्ताहापूर्वी मुसळधार पावसाने डेपो परिसर पूर्णपणे चिखलमय झालेला होता, त्यामुळे बसेसच्या आवागमनास व प्रवाश्यांना अतिशय गैरसोय झाली होती. दि. १२ एप्रिल २०२४ रोजी निगम आयुक्तांनी याठिकाणी पाहणी-दौरा करून मनपा हॉट मिक्स प्लान्टच्या कार्यकारी अभियंता यांना डेपो परिसराचे खडकीकरण व समतलीकरण करण्याचे निर्देशित केले. तसेच, डेपोच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारा पासून दुतर्फा रस्त्याची निर्मिती करण्यास सांगितले. तत्कालीनप्रसंगी, मनपाचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता (साबावि) व परिवहन व्यवस्थापक हे देखील उपस्थित होते.परिवहन विभागाचे समन्वयातून डेपोतील संपूर्ण जागेचे खडीकरण व समतलीकरण मनपा हॉट मिक्स प्लान्ट विभागाचेवतीने नियोजनपूर्वक जलदगतीने करण्यात आले असून बस वाहतूक व्यवस्था सुचारुपणे कार्यान्वित झालेली आहे. तसेच, दोन प्रवेशद्वारापैकी दक्षिणेकडील १२x९० मी. आतीलरस्त्याचे काम आज पूर्ण करण्यात आले असून १२x१०० मी. चा दुसरा मुख्यरस्ता व ९ मी. रूंदीचे इतर रस्ते तसेच पावसाळी नालीचे काम देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी नियोजन हे प्रकल्प सल्लागाराचे मदतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा हॉट मिक्स प्लान्टचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *