उपद्रव शोध पथकाची मोहिम : स्वच्छ भारत अभियान
मनपाच्या धंतोली झोन मधील नरेंद्र नगर येथे बालपांडे इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी मनपाद्वारे कारवाई करण्यात आली व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. गांधीबाग झोन पथकाद्वारे गोळीबार चौकातील रोनीत स्वीट्स, सागर स्वीट्स, राजेश स्वीट्स आणि महाकाली स्वीट्स या प्रतिष्ठानांवर प्रतिबंधित प्लास्टिक नियमाच्या उल्लंघनाबाबत कारवाई करण्यात आली. चारही प्रतिष्ठानांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंडासह प्रत्येकी १ किलो प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली.
आशीनगर झोन पथकाद्वारे पिवळी नदी येथील इंदोर स्वीट्सवर देखील प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात कारवाई करून १ किलो प्लास्टिक जप्त करून ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. मंगळवारी झोनमधील गिट्टीखदान काटोल रोड मार्गावरील एसपीएल फिटनेस हबद्वारे अवैधरित्या विद्युत खांबांवर बॅनर/होर्डिंग लावून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५ हजार रुपये आणि सदर येथील गोपीनाथ तिवारी यांच्याद्वारे फुटपाथवर पाणी पुरी ठेला लावणेचे प्रकरणी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
शहरातील उपरोक्त ठिकाणी करण्यात आलेल्या ८ ठिकाणच्या कारवाईमधून ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
