‘भारताचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर- यांचा जीवन प्रवास’ यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर येथे ६ ते ८ डिसेंबर दरम्यान आयोजन
नागपूर, दि. ५: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, माता कचेरी, नागपूर येथे ‘भारताचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास’ या विषयावर आधारीत छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ६ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. सदर प्रदर्शनात भारताचे संविधान आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर-यांचा जीवन प्रवासाची माहिती सांगणारे छायाचित्र, ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शन ६ ते ८ डिसेंबर, २०२२ पर्यन्त सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. ही प्रदर्शनी नागरिकांसाठी नि:शुल्क राहणार आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी भेट देऊन बाबासाहेबांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नागपूर यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
