Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

मुबंई: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठातील विविध शाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठातील ७६ परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर २७ परीक्षांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या ५, तर आंतरविद्या शाखेच्या १८ अशा एकूण २७ परीक्षांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

तर वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा अशा एकूण ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपूर्वी सुरु होतील. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखेदरम्यान येत असल्याने तेवढ्याच पेपरचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *