Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई पोलिसांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या ४४८ सदनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मुंबई पोलिसांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या ४४८ सदनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारतींचा समावेश असणार आहे.

पोलिस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *