मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागवलं स्पष्टीकरण
लसीकरण न केलेल्यांना रेल्वे प्रवास नाकारण्याच्या निर्णयाबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणणारा आहे, अशा आशयाच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान रेल्वे प्रवासासाठीच्या बंधनासंदर्भात झालेल्या बैठकीची टिपणे उपलब्ध नसल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. हा निर्णय योग्य आणि तज्ञांशी सल्लामसलत करून घेतला होता का अशी विचारणा न्यायालयाने राज्यशासनाला केली होती.
Source-AIR
