मुंबई महानगर पालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिपिकसह विविध पदांसाठीच्या लेखी परीक्षा केल्या रद्द
मुंबई, दि. १४: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर, मुंबई महानगर पालिकेनं लिपिकसह विविध पदांसाठीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या आहेत.
१६ ते १८ एप्रिल दरम्यान विभागीय स्तरावर मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा घेतल्या जाणार होत्या. या परीक्षेसाठी पालिकेतले सुमारे २ हजार ७०० लिपिक सहभागी होणार होते. मात्र वाढत्या कोरोनामुळे ही परीक्षा तूर्त रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
