मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा ३ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२२-२३ या वर्षाचा ३ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी आज शिक्षण समितीसमोर सादर केला.
कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरात शिक्षणावर पुरेसा खर्च झाला नसल्यानं यंदाच्या शिक्षण विभाागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. कार्यानुभव शिक्षण ऑनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, ई-वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, विद्यार्थ्यांच्या आरोग्य साधनांवर सुधारणा असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे.
Source-AIR
