मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रवीण दरेकर विराजमान
मुंबई: मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची पुन्हा निवड झाली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी आज ते बिनविरोध निवडून आले तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी निवडून आले होते. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. गेले कित्येक वर्ष प्रवीण दरेकर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर कायम होते.
