मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट देत घेतले गणारायचे दर्शन
मुंबई, दि. २३: देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लालबाग च्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते विनोद तावडे व आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत विधिवत पूजा केली.

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
