मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत १३व्या स्थानी
फॉर्ब्स ने नुकतीच जगातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीज चे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील १३व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फॉर्ब्स च्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे ऍमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक बिल गेट्स आणि वॉरेन बफे आहेत. गतवर्षी मुकेश अंबानी २० व्या स्थानी होते पण ह्या वर्षी त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन ते १३ व्या स्थानी आले.
