Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एमपीएससी(MPSC)तर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (२०२२) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

एमपीएससी(MPSC)तर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (२०२२) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ या परीक्षेतून गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदाच्या एकूण २३ संवर्गांसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक २७ मार्च, २०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तद्नंतर शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *