Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १७ : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचएमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *