Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल एमपीएससी कडून जाहीर

थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल एमपीएससी कडून जाहीर

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीस अनुसरुन करण्यात आलेल्या थेट भरतीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, नेत्ररुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ, दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैज्ञानिक अधिकारी अन्न व औषध प्रशासन गट ब, दि. १२ आणि १३ ऑक्टोबर २०२२, रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या सहायक आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ तसेच दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सा गट अ सार्वजनिक आरोग्य विभाग या विविध पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *