ठरलं! १७ ऑगस्ट पासून सुरू होणार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
मुंबई, दि. १० : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे आदेश दिले आहेत. या अधिवेशनातलं कामकाज, अधिवेशनाचा कालावधी यासंदर्भात लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल असे कळते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र संसदीय कार्य विभागाने कळवल्यानुसार ऐनवेळी हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा विधीमंडळ सचिवालयालने केली होती.

गेल्या महिन्यात ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्यात एकनाथ शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड आणि नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड झाली होती.