भाजप सांगेल त्याला निवडून देऊ…मोहिते पाटील, नाईक निंबाळकर
पंढरपूर: राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल(२७ मार्च) रात्री अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली.
भाजप जो उमेदवार ठरवेल, त्याला आपण निवडूण आणू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे. तर भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील, असं रणजितसिंह नाईक निबांळकर यांनी म्हटलं आहे.
भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याला आपण निवडून आणणार असल्याचं दोघांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. उमेदवारीपेक्षा कृष्णा भीमा स्थिरीकरण होणं जास्त महत्त्वाचं असल्याचंही मोहिते पाटील म्हणाले.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्यातील जागेवरुन आधी त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी भाजपप्रवेश केल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. आता विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
त्यामुळे माढ्यातील सामना आता नेमका कोणामध्ये रंगणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे.
