घराणेशाही जपणाऱ्या राजकीय पक्षांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या लोकशाहीचे फार मोठं नुकसान केल्याची प्रधानमंत्र्यांची टीका
जयपूर: घराणेशाही जपणाऱ्या राजकीय पक्षांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या लोकशाहीचं फार मोठं नुकसान केलं आहे, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते काल जयपूर मध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
या परिवारवादी आणि वंशवादी पक्षांमुळे देशात भ्रष्टाचार, घोटाळे, सत्तेचं केंद्रीकरण आणि लोकशाहीच्या तत्वांचं गैर व्यवस्थापन या गोष्टींमध्ये वाढ झाली, असं ते म्हणाले. केवळ भाजपानंच २०१४ पासून गेल्या ८ वर्षांमध्ये देशातल्या तरुणांचा गमावलेला विश्वास परत मिळवला आहे. विरोधी पक्षांनी जात आणि धर्माच्या आधारावर राष्ट्राचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला, असही ते म्हणाले.
