Narendra Modi Tweeter
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला गर्भित इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवर हल्ला केलेल्या अतिरेक्यांना तसेच त्यांच्या म्होरक्यांना गर्भित इशारा दिला आहे. ह्या ट्विट च्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान ला एक इशाराच दिला आहे. त्याच वेळी देशवासियांनाही त्यांनी संबोधित केलं आहे.
ते म्हणतात,
“मी अतिरेकी संघटना आणि त्याच्या म्होरक्यांना सांगू इच्छितो की ते फार मोठी चूक करत आहेत.
मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की ह्या हल्ल्यामागे ज्या शक्ती आहेत, जे ह्या हल्ल्यात सामील आहेत त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा जरूर मिळणार”
मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वो बहुत बड़ी गलती कर गए हैं।
मैं देश को भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकते हैं, इस हमले के जो भी गुनहगार हैं, उन्हें उनके किए की सज़ा अवश्य मिलेगी: PM
— PMO India (@PMOIndia) February 15, 2019
त्यातच वेळी देशभरातूनही ह्या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे. सामान्य जनताही उरी सारखी सर्जिकल स्ट्राईक पुन्हा व्हावी अशी मागणी सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमांतून करताना दिसत आहे.
