‘काँग्रेस चे नेते मला गटारातला किडा म्हणाले, वेडा कुत्रा म्हणाले’…पंतप्रधान मोदी झाले भावुक
कुरुक्षेत्र: आज (दि.८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुरुक्षेत्रात प्रचार रॅली दरम्यान म्हणाले की, काँग्रेस च्या लोकांनी मला प्रेमाच्या नावावर शिव्या देतात. पंतप्रधान मोदी भावुक होऊन पुढे म्हणाले की, “यांच्या प्रेम नावाच्या शब्दकोशात माझ्यासाठी विविध प्रकारच्या शिव्याच दिल्या आहेत. मी पंतप्रधान झाल्यावर यांनी मला शिव्या दिल्या आणि मला हेही विचारलं की माझे वडील कोण आहेत. यांच्या शिव्यांची पर्वा न करता मी देशाची सेवा करत आहे.
ते पुढे गहिवरून म्हणाले, तुम्ही माझा परिवार आहात. तुमची भरभराट हेच माझं ध्येय आहे. काँग्रेस च्या घराणेशाहीला आव्हान देतो यामुळे हे मला प्रेमाचा नकाब घालून शिव्या देत आहेत. काँग्रेसवर हल्ला करताना मोदी म्हणाले की मी काँग्रेस व त्यांच्या साथीदारांचा भ्रष्टाचार थांबवला तर यांनी मला प्रेमाच्या नावावर शिव्याच दिल्या. काँग्रेस चे नेते मला गटारातला किडा म्हणाले, वेडा कुत्रा म्हणाले, माकड म्हणाले, मौत का सौदागर म्हणाले. यांची नियत मोदीचे तुकडे तुकडे करण्याची आहे.
अशा प्रकारे मोदींनी कुरुक्षेत्रातल्या रणात काँग्रेसवर हल्लाबोल केला.
BJP’s good governance agenda will defeat negativity of Congress. Watch from Kurukshetra. https://t.co/BYHe0ubmiF
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2019
