MNS Dahisar Marathi Din
मनसे दहिसर विभागातर्फे जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
दिनांक २७ फेब्रुवारी, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित “कवीवर्य श्री.वि.वा. शिरवाडकर” म्हणजेच “कुसुमाग्रज” यांचा जन्म दिवस. हा दिवस “जागतिक मराठी भाषा दिन” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. तेच औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, दहिसर विधानसभा वतीने, दहिसर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सर्व मराठी, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषिक शाळांना भेट देऊन तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची ५वी ते ७वी आणि ८वी ते ९वी या दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री. कुणाल उमेश मेस्त्री यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले.
सायंकाळी, दहिसर येथील रिव्हर विव्ह्यू हॉल मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष श्री. राजेश येरूणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्या गुणवंत विद्यार्थ्याना झालेल्या सन्मानित करण्यात आले. तसेच, सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संस्कृतील लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या असलेल्या पोवाडा, लावणी, कोळी गीत ह्यावर नृत्य सादर करून तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या गायनाने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यां बरोबर पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री. कुणाल उमेश मेस्त्री यांनी केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग सचिव किरण गायकवाड, विद्यार्थिनी विभाग अध्यक्षा कु. सुचिता टेंबुरकर, विद्यार्थिनी विभाग सचिव कु. प्रियांका थोरात, मनविसे उपविभाग अध्यक्ष अमोद कदम, नरेंद्र भानसे, संकेत पवार, अक्षय जाधव, वॉर्ड अध्यक्ष विशाल कारंडे, सागर दळवी, सिद्धेश दळवी, अजय वारस्कर, सागर मोरे यांचा ह्या उपक्रमात मोलाचा सहभाग होता.
तसेच, ओंकार शिर्के, कुमार शिंदे, उदय कांबळे, भालचंद्र गायकवाड, परशुराम कोळी, संजय मेस्त्री, प्रवीण तसेच विभागातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
