Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त मनसे कोकणात सोडणार बसेस; १ ऑगस्ट पासून होणार नोंदणीस सुरुवात

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार अकार्यक्षम असून आम्ही प्रशासनाकडे कोकणासाठी बस सोडण्याची मागणी केली होती पण अद्याप कोणतंच उत्तर आलेलं नाही. त्यामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी सेना यांच्या मार्फत येत्या ४ ऑगस्ट पासून कोकणात बसेस सोडण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. १ ऑगस्ट पासून यासाठी नोंदणी सुरू होणार असल्याचे संदीप देशपांडे शेवटी म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *