Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बेरोजगारी चे Side Effect; मनसेच्या रद्द झालेल्या मेळाव्यालाही बेरोजगारांनी लावली हजेरी

बेरोजगारी चे Side Effect; मनसेच्या रद्द झालेल्या मेळाव्यालाही बेरोजगारांनी लावली हजेरी

उरण दि. २६(विठ्ठल ममताबादे): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि शासनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्देशामूळे काल गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मनसेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, नवीन पनवेल येथे घेण्यात येणारा नोकरी व व्यवसाय मेळाव्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

सदर निरोप सर्व लोकांकडे वेळेत न पोहचल्या कारणाने सुमारे १५० बेरोजगार तरुण तरुणी फिजिकल डिस्टन्स पाळून ह्या ठिकाणी उपस्थित झाले होते. या बेरोजगार जनतेला उत्तर देण्याकरिता व त्यांची माहिती घेण्याकरिता, मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे, मनसे रोजगार विभागाचे रायगड जिल्हा संघटक रामदास पाटील आणि खालापूर तालुका संघटक संजय तन्ना उपस्थित होते.

ह्यावरून असे कळते की जनतेला लॉकडाऊन आणि कोरोनाची चिंता नसून स्वतःच्या रोजगाराची व पोटापाण्याची चिंता आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी मनसेने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या मेळाव्यात रिलायन्स स्मार्ट समूहाने ५० तरुण-तरुणींचे बायोडाटा निवडले आहेत व त्यांना ह्या समूहाकडून त्वरित नोकरी देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.

या मेळाव्यात नोकरी मिळालेल्या बेरोजगारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार विभाग रायगड जिल्हाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *