मेलबर्न कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताची ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची आघाडी घेतली.
आज तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या ५ गडी बाद २७७ धावांवरून पुढे खेळ सुरु केला. मात्र कालच्या धावसंख्येत केवळ ४९ धावांची भर घालत भारताचा पहिला डाव ३२६ धावांमधे आटोपला.
कर्णधार रहाणेनं ११२ तर जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची फलंदाची भारताच्या गोलंदाजांसमोर पुन्हा एकदा गडगडली. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं सहा गड्यांच्या मोबदल्यात १३३ धावा करत दोन धावांची आघाडी घेतली आहे.
