Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

मुंबई, दि.२३: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत  एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *