Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास AICTE ची परवानगी

एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास AICTE ची परवानगी

नवी दिल्ली: एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे.
कोविड १९ साथीच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांसाठीच्या विविध प्रवेश परीक्षा घेणं शक्य नसल्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीच ही सवलत दिल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. प्रवेश देताना याआधी प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव राजीव कुमार यांनी आज ही माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *