मराठा आरक्षणासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
सांगली, दि.२: सांगलीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज अन्याय निर्मूलन समिती तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शनं करण्यात आली.
राज्य सरकारने जी मेगा भरती काढली आहे. ती मराठा समाजाला मिळावी. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम तात्काळ पूर्ण करावे, तसंच आदिवासी कोळी महादेव जमातीचे आणि इतर मुस्लिम, धनगर, लिंगायत, बारा बलुतेदार यांनाही आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज निदर्शनं करण्यात आली.
