मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा गुरुवारचा मुक्काम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट यार्डात
नवी मुंबई, दि. २३: मराठा आंदोलकांचा मुक्काम गुरुवारी नवी मुंबईत असेल. त्यांच्या राहण्याची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या मार्केट परिसरात केली जाईल. त्यामुळे २५ जानेवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातली पाचही मार्केट बंद राहतील. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची बाजार समितीला सुटी राहणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली.
