‘मन की बात ‘कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांकडून मागवल्या सूचना
नवी दिल्ली, दि. १७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार्या मन की बात या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहे. या महिन्याच्या मन की बात साठी नागरिक मोठ्या संख्येने सूचना पाठवत असल्याचे पाहून त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. ज्यांनी आपले विचार आणि सूचना अद्याप MyGov किंवा NaMo ॲपवर सामाईक केलेले नाहीत त्यांना सूचना पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“२६ तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या #MannKiBaat साठी नागरिक मोठ्या संख्येने सूचना पाठवत असल्याचे पाहून आनंद झाला.
लोकांनी दिलेली प्रेरणादायी जीवन प्रवासाची माहिती हा या कार्यक्रमाचा गाभा आहे.
ज्यांनी अद्याप आपले विचार आणि सूचना सामाईक केले नाहीत ते MyGov किंवा NaMo ॲपवर करू शकतात.
