प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात आपले विचार मांडतील. या कार्यक्रमाचा हा ८३ वा भाग असेल.
हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणी बातम्यांच्या संकेतस्थळावर आणि newsonair या मोबाइल अॅपवर प्रसारित केला जाईल. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये आकाशवाणीवर हा कार्यक्रम प्रसारित होईल. प्रादेशिक भाषेतील कार्यक्रम रात्री ८ वाजता पुन्हा प्रसारित होतील.
Source-AIR
